ITBP Bharti 2024 : ITBP म्हणजे काय नक्की? तर ITBP चा फुल फॉर्म हा Indo- Tibetan Border police आहे. ITBP हे तिबेट स्वायत्त प्रदेशासह त्याच्या सिमेवर भारताचे निमलष्करी सीमा दल आहे.
भारत तिबेट सीमा दलाने भरती काढलेली आहे. जर तुम्ही दहावी पास, बारावी पास, डिप्लोमा अथवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असाल तर ही भरती तुमच्या करिता आहे आणि त्याच बरोबर तुमच्याकडे अन्न निर्माण म्हणजेच फूड प्रोडक्शन चा कोर्स झालेला असावा. ITBP या नामांकित विभागामध्ये कॉन्स्टेबल (स्वयंपाक घर सेवा) या पदासाठी तुम्हाला सुवर्णसंधी मिळत आहे.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. आपला या भरतीसाठी चा अर्ज भरण्याची प्रक्रिया ०२ सप्टेंबर २०२४ रोजी सुरू झाली आहे. सर्व पात्र व इच्छुक असलेल्या उमेवारांनी अर्ज अंतिम तारीख येण्याआधी लवकरात लवकर भरावा. उमेदवारांना अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही ०१ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत दिलेली आहे.
ITBP अधिकृत वेबसाईट वर जाहिरात मध्ये दिलेल्या नुसार ITBP भरती ही ८१९ रिक्त पदांसाठी होणार आहे, ITBP Bharti 2024 महवाच्या माहितीसाठी आपण टेबल स्वरूपात थोडक्यात पाहूया :
ITBP Bharti 2024 बद्दल महवाची माहिती
संस्थेचे नाव :- | इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल भरती २०२४ |
विभागाचे नाव :- | ITBP |
भरती श्रेणी :- | सरकारी |
पदाचे नाव :- | कॉन्स्टेबल ( स्वयंपाक घर सेवा) |
शैक्षणिक पात्रता :- | १०वी पास आणि फूड प्रोडक्शन कोर्स |
निवड प्रक्रिया :- | परीक्षेद्वारे |
नोकरीचे ठिकाण :- | संपूर्ण देशभर |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :- | ०१ ऑक्टोंबर २०२४ |
अर्ज पद्धत :- | ऑनाईन |
उपलब्ध रिक्त जागा : | ८१९ रिक्त जागा |
ITBP Bharti 2024 साठी असणारी वयमर्यादा
आता आपण पाहूया ITBP Bharti 2024 साठी असणारे वयमर्यादा, वेतन श्रेणी, व आवश्यक कागतपत्रे
- वयोमर्यादा : या भरती साठी तुमचे वय हे १८ ते २५ वर्ष असणे गरजेचे आहे.
- वेतन श्रेणी: जर तुम्ही या भरती साठी पात्र असाल तर तुम्हाला दर महा रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/- मिळणार आहे.
ITBP Bharti 2024 साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साइज फोटो (आताचा)
- आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवार स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिनल
- डोमासाईल प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागतपत्रे
- एम.एस.सी.आय.टी व इतर प्रमाणपत्रे (असल्यास)
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
ITBP Bharti 2024 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया
- अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.
- अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही ०१ ऑक्टोंबर २०२४ आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
- खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
- मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
- अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- अर्जा मध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागटपत्रे अपलोड करावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
- उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे होणार असल्यामुळे याची काही फी असणार आहे , ती फी भरल्यानंतरच तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
- फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.
महत्वाच्या काही लिंक्स:
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी:- | येथे क्लिक करा |
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी:- | येथे क्लिक करा |
टीप :- संपूर्ण माहिती एकदा परत अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील वाचावी.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
नवीन जाहिराती पहा :
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मिरज अंतर्गत भरती आजच अर्ज करा – GMC Miraj Bharti 2024